राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : जिल्हा वृत्तांत -ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार यांना शासनाकडुन 59% दरवाढ मिळावी, या मागणीसाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने ऊसतोड मजुरांचा संप पुकारल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियननेही याच मागण्यासाठी मागण्यासाठी संपला आहे. त्यामुळे यंदा साखर कारखान्यांना गाळप हंगामापूर्वी संपाचा सामना करावा लागणार आहे.
ऊस तोडणी कामगार मुकादम वाहतूकदार यांना कारखान्याकडून दिल्या जाणाऱ्या दरात 50 टक्के वाढ करावी अन्यथा ऊस तोडणी कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांनी सोमवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना दिला ते म्हणाले सध्या ऊसतोड कामगाराला डोकी सेंटरला 273 गाडी सेंटर व टायर बैलगाडीला 304 रुपये प्रति टन तर किलोमीटर ला 14 रुपये त्यांना पैसे मिळत आहे मात्र सध्याच्या महागाईचा आणि मजुरीचा दर पाहता हे पैसे पुरेसे नाहीत ऊस तोडणी कामगाराच्या मजुरी बाबतच्या कारकाराला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत त्यामुळे शासनाने सध्या मिळत असलेल्या तोडणी कामगाराच्या दरात 50 टक्के वाढ करावी अशी मागणी आहे याबाबत राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.
Leave a reply