Disha Shakti

क्राईम

घरफोडी करणारी टोळी कोपरगावमध्ये जेरबंद 6 मोबाईल, 3 दुचाकींसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

कोपरगाव तालुका प्रतिनिधी / रणवीर लोट : दिवसा रेकी करून रात्रीच्यावेळी घरफोडी करणारी तीन जणांची टोळी कोपरगाव शहर पोलिसांनी गुरुवार दि. 12 ऑक्टोबर रोजी पकडली. त्यांच्याकडून सहा मोबाईल, तीन दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने आदी 5 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कोपरगाव शहरातील जुन्या टाकळी रस्त्यावरील साई नक्षत्र हाईट्स येथील आजिंक्य लक्ष्मण कदम यांच्या घरी दि. 5 ऑगस्ट रोजी घरफोडी झाली होती. कदम यांची पत्नी घर उघडे ठेवून किरकोळ कामासाठी खाली गेली असताना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून 60 हजार रुपयांचे दोन तोळ्याचे सोन्याचे दागीने, 14 हजार रुपये रोख व इतर 4 हजार असा एकूण 78 हजार रुपायांचा मुद्देमाल चोरून नेला.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास कोपरगाव शहर पोलीस करीत असतानाच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभम भागवत शिर्के (रा. ब्रिजलालनगर, कोपरगाव) यास ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार महेश मोहन सोनवणे (रा. बेट कोपरगाव) व ओमकार नितीन नागरे (रा. अंबिकानगर, कोपरगाव) यांच्या मदतीने कोपरगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या व चोर्‍या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किंमतीची यामाहा कंपनीची दुचाकी, 75 व 85 हजारांच्या दोन प्लॅटीना दुचाकी, चार हजार रुपयांची चांदी, सहा मोबाईल, 86 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून ताब्यात घेतला. या टोळीने चार गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली.

ही कारवाई शहर पो. नि. प्रदीप देशमुख, पो. उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पो.हे.कॉ. डी. आर. तिकाणे, बाबासाहेब कोरेकर, अर्जुन दारकुंडे, जालिंदर तमनर, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, महेश फड, विलास मासाळ, यमनाजी सुंबे, तुषार कानवडे, बाळू धोंगडे, गणेश काकडे, राम खारतोडे यांनी केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!