राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या म्हैसगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चा बांधणीसाठी गावातील पुढारी सरसावले राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असून, सर्वसाधारण गावातील महिला जागेसाठी लोकनियुक्त सरपंच पद असल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्यावर बाशिंग बांधली आहे. गावातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे म्हैसगाव निवडणूक तिरंगी लढतीसोबतच अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावणार असल्याचे निदर्शनास येत आहे.
राहुरी तालुक्यातील बावीस ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्याने बावीस गावात राजकीय वातावरण माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे या प्रतिष्ठित इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. म्हैसगाव ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया होऊन पाच नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे गावात निवडणुकीचे वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे.आजी-माजी सरपंचासह पुढारी दिवसा नागरिकांच्या भेटीसाठी घेत असून रात्रीच्या वेळी बैठकांवर भर देत आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळच्या पारगात गावातील चौक गर्दीने फुललेला दिसून येत आहे.
सोळा तारखेला नाम निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने लोकायुक्त सरपंचासह याबाबत गावातील पुढार्यांनी इतर उमेदवार कोणते असावेत. विशेष भर दिला आहे. तर सत्ता भोगलेले पदाधिकारी व यापूर्वी निवडणूकीत पराजय झालेले ठराविक कार्यकर्ते ठीक ठिकाणाची नाराजी करण्यात गुंतले असून नागरिकांची मनधरणी करत आहेत. म्हैसगाव हे राहुरी मतदार संघ येत असल्याने गावात तनपुरे व कर्डिले विखे असे दोन गट पडलेले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी या पक्षाला मानणाराही येथे आहे. त्यामुळे यावेळी म्हैसगाव ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Leave a reply