Disha Shakti

क्राईम

शिर्डीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; डी.वाय.एस.पी.संदिप मिटके यांची धडाकेबाज कारवाई

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार :  शिर्डीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली असून चार महिन्यात ही दुसरी घटना उघडकीस आली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पॉश बंगल्यात रीलॅक्स नावाने स्पा सेंटर सुरू होते. या बंगल्यात सात ते आठ रूम्स असून लाईटच्या झघमगाट, महागडे फर्निचर आणि अतिशय आकर्षक बोर्डवर वेगवेगळ्या मसाजचे फोटो लावून ग्राहकांना आकर्षित केले जात असे.

या स्पा सेंटरचा चालक गणेश कानडे हा यापूर्वी अनेकवेळा देहव्यापाराच्या प्रकारात आरोपी आहे. हा शिर्डीतील रहिवासी असून याचा हा व्यवसाय अनेक महिन्यांपासून सुरू होता.या व्यवसायासाठी तो परराज्यातील तसेच मुंबई नाशिक येथील मुलींना बोलावून त्यांच्याकडून स्पा च्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता. शिर्डीचे उपअधीक्षक संदिप मिटके यांच्या रडारवर गणेश कानडे होता परंतु तो शातीर असलेला कानडे प्रत्येकवेळी वेगवेगळे सिमकार्ड वापरून ग्राहकांशी संपर्क करून छुप्यारीतीने सेक्स रॅकेट चालवतो अशी गुप्त माहिती मिटके यांना मिळाली होती.

त्यांनी लागलीच चक्रे फिरवून आपल्या टीममधील एका कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक बनवून या रीलॅक्स स्पा सेंटरमध्ये पाठविले, त्यावेळी येथे दोन परप्रांतीय मुली, मॅनेजर असे तीन जण मिळून आले तर मुख्य आरोपी तथा हे रॅकेट चालविणारा गणेश कानडे मात्र फरार झाला. गणेश कानडे हा शिर्डी तसेच परिसरातील आंबट शौकिनांना मुली पुरविण्याच काम अनेक दिवसांपासून करत असून त्यासाठी तो ठराविक हॉटेलमध्ये शातीरपणे ग्राहकांना मुली पुरवून हे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यामाध्यमातून तो लाखो रुपयांची कमाई करत होता. त्याच्याबरोबर अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असल्याने त्याचा शिर्डीत चांगलाच दबदबा आहे. यापूर्वी सुद्धा तो पिटाच्या कारवाईत अनेकवेळा सापडला असून पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

यापूर्वी शिर्डीतील काही हॉटेलवर छुप्या मार्गाने हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश संदिप मिटके यांनी केला होता. तर हॉटेल मालकांना सुद्धा आरोपी करून आपल्या कारवाईचा दणका दाखवून दिला. शिर्डीत कोणत्याही अवैध व्यवसाईकांची गय केली जाणार नाही त्यासाठी नागरिकांनी निर्भीडपणे फोन करून अशा घटनेची गुप्त माहिती द्यावी आम्ही तात्काळ कडक कारवाई करू असे मिटके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. शिर्डीतील त्यांच्या धडक कारवाईचे अनेकांनी अभिनंदन केले असून अनेक वर्षानंतर असा दबंग अधिकारी लाभल्याने शिर्डी शहर दहशतमुक्त, गुन्हेगारीमुक्त होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!