राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील 18 वर्षांखालील बालकांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणीमध्ये काही बालकांवर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते.अशा 18 बालकांची येन्या- जाण्याची , राहण्याची, जेवणाची सोय माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी सोय केली.या रुग्णांची व त्यांच्या पालकांची आमदार तनपुरे व सोनालीताई तनपुरे यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
मुंबई येथे सर्व रुग्ण व त्यांच्या पालकांची दुसऱ्या टप्प्यात तपासणीनंतर काही बालकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील एस आर सी सी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी पालकांशी संवाद साधला, त्यांना आधार दिला जाताना बालक रुग्णांना खाऊचे वाटप केले. आपल्या मुलांना बरे वाटावे म्हणून दिवस रात्र महिन्यात करणाऱ्या या आई-वडिलांच्या प्रार्थनेला अखेर प्रतिसाद मिळाला.
शस्त्रक्रियेनंतर या मुलांच्या आयुष्यात एक नवीन पहाट येणार असल्याचे आमदार तनपुरे म्हणाले. पुढील टप्प्यातून हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बालकांना मुंबईत मोफत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष संतोष आघाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष महेश उदावंत, नरेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
सर्व रुगणांची जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था तसेच मुंबई येथे राहण्याची व्यवस्था नाष्टा, जेवण आदी सर्व सुविधा आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी स्वखर्चाने केली आहे. आमदार प्राजक्त दादा तनपुरे व सोनालीताई तनपुरे यांनी स्वतः या बालकांची मुंबई येथील एस आर सी सी बाल रुग्णालयात भेट घेऊन आस्थेने चौकशी केली.
Leave a reply