विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार व अक्षय कॉर्नर परिसरातून सुमारे 52 हजारांचे एकूण 5 मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. एकाच दिवशी या घटना घडल्याने भुरट्या चोरांनी हे मोबाईल चोरले की शहरात मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय झाली? अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात अशोक दामोधर भगत (रा. वॉर्ड नं. 1 श्रीरामपूर), श्रीकांत सोनार (रा. रांजणखोल) व अशोक सांडू शेळके (रा. रांजणखोल) यांचे मोबाईल शहरातील अक्षय कॉर्नर परिसरातून चोरीस गेले. याबाबत श्री. भगत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर अशोक लक्ष्मण धाडगे (रा. बँक कॉलनी, श्रीरामपूर) व प्रसाद मारुती तर्हाळ (रा. वॉर्ड नं. 7 श्रीरामपूर) यांचे मोबाईल शुक्रवारच्या आठवडे बाजारातून चोरीस गेले आहे. याबाबत श्री. धाडगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहे.
Leave a reply