विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसाला दहा तास मोफत अखंडित वीज पुरवठा करून, नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण व सरकारी शाळांचे व्यापारीकरण हा अन्यायकारक निर्णय मागे घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षा शुल्क जाचक स्वरूपाचे असल्याने रद्द करण्याची मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसाला किमान दहा तास मोफत अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा तसेच नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण व सरकारी शाळेचे व्यापारीकरण हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे एक हजार रुपये परीक्षा शुल्क जाचक स्वरूपाचे असल्याने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यावर सर्वात आधी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पहिला प्रयत्न असणार असल्याचा दावा केला होता. मात्र आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्नही निरुपयोगी ठरताना दिसून आले.
कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहे. ही आत्महत्याची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी असून शेतकऱ्यांना मोफत पाणी व मोफत वीज पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे किमान दहा तास दिवसा मोफत अखंडित वीज पुरवठा करण्यात यावी तसेच नोकऱ्याचे खाजगीकरण व कंत्राटीकरण व सरकारी शाळेचे व्यापारीकरण हा अन्यायकारक निर्णय असल्याने सरकारने तो मागे घ्यावा जो निर्णय सरकारी नोकरीची भरती वेगळ्या खाजगी कंपनीकडून करण्याची घोषणा केली असून सदर कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने ही भरती होईल ही अन्याय कारक आहे. राज्यातील ग्रामीण शहरी व निमशहरी भागातील विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षा ची तयारी करतात त्यांना खाजगी कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने भरती केल्यामुळे तरुणांचे भवितव्य धोक्यात येईल.
याचबरोबर समूह शाळा या गोडस नावाखाली राज्यातील 14 हजार शाळा बंद करणे म्हणजे फुले शाहू यांनी घडवलेल्या महाराष्ट्राला कलंकित करणारी ही बाब आहे. त्यामुळे हा आत्मघातकी निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात रिक्त पदाचा आढावा घेत शिंदे फडणवीस सरकारने नोकर भरती जाहीर केलेली आहे. या अंतर्गत सरळ सेवा परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस व आयबीपीएस या दोन संस्थांकडे दिली आहे. राज्यात तब्बल १० वर्षानंतर तलाठी, जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग असे विविध विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे परंतु एक हजार रुपये परीक्षा शुल्क लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
विद्यार्थी हे दिवस-रात्र ग्रंथालय मध्ये बसून अभ्यास करतात आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून धैर्य उद्दिष्टाकडे वाटचाल करतात अत्यंत कमी खर्चामध्ये आपला महिना कसा निघेल याचा विद्यार्थी विचार करत असतात भ्रष्टाचाराच्या जगात गुणवत्तेवर नोकरी मिळण्याचा एकच मार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा त्यातच स्पर्धा परीक्षेच्या एका पेपर साठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क मोजायचे म्हणजे विद्यार्थ्यांना दहा ठिकाणी फॉर्म भरायचा झाल्यास दहा हजार रुपये एवढे परीक्षा शुल्क या गरीब विद्यार्थ्यांनी आणायचे कुठून? स्वातंत्र्याचे अमृत वर्ष साजरी करत असलो तरी आम्हाला गरिबांना असे वाटत आहे की पुन्हा इंग्रजांचे राज्य आले की काय आणि पुन्हा स्वातंत्र्यासाठी लढा उभारावा लागेल की काय इतका गोरगरीब जनतेवर अन्याय होत असून सरकारने खाजगी कंपन्यांचे खिसे भरणे बंद करून जे काही परीक्षा शुल्क आहे ते रद्द करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करावे.
शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहे आता त्यावर काही उपाययोजना राबवल्या जात नाही पण विद्यार्थ्यांवर बेरोजगार तरुणांवर असे जाचक निर्णय लादण्याने विद्यार्थी आत्महत्या ची संख्या वाढणार यात शंका नाही त्यामुळे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा किमान दहा तास मोफत अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा तसेच नोकऱ्याचे खाजगीकरण व कंत्राटीकरण व सरकारी शाळेचे व्यापारीकरण हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे एक हजार रुपये परीक्षा शुल्क जाचक स्वरूपाचे असल्याने रद्द करण्यात यावे या विविध मागण्या मान्य होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बाबुराव कोळसे समवेत प्रा.प्रशांत म्हस्के, पै.छगन पानसरे, सोपानराव रावडे, ओमकार बडाख, नानाभाऊ पडळकर, प्रगतशील शेतकरी दिनकरराव डमाळे, सुखदेव शेंडे, राजाजी बुधवंत, चंद्रशेखर शेटे, अफसर शेख सोन्याबापू रुपणर, ठकाजी रुपणर, नवनाथ सोलाट, जावेद शेख(Aj टूर्स)आदी उपस्थित होते.
शेतकऱ्याच्या मुलाचे शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

0Share
Leave a reply