राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : शेतकऱ्यांची मुलं उद्योग व्यापारात पुढे आली पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते सुधाकर तनपुरे यांनी केले. राहुरी तालुका खरेदी विक्री संघाने नव्याने नगर मनमाड राज्य मार्गावर बांधलेल्या व्यापारी संकुलास डॉक्टर दादासाहेब साहेब तनपुरे यांचे नाव व्यापारी संकुलाला दिले.
फलकाचे अनावरण करण्यात आले. अनावरा नंतर झालेल्या कार्यक्रमात या पुढील काळात संघाने दिलेल्या नावास साजेसे काम खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते व खरेदी विक्री संघाचे मार्गदर्शक सुधाकर तनपुरे यांनी केले. तनपुरे म्हणाले की, पुढील काळात संघाच्या नगर मनमाड रोडवरील जागेवर अजूनही मोठे दुसरे व्यापारी संकूल उभारुन उद्योग व्यवसायात शेतकऱ्यांची मुले कशी पुढे जातील
यासाठी प्रयत्न करावेत व त्यामुळे खरेदी विक्री संघ आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल, असे आवाहन पंढरीनाथ पवार यांनी केले. संघाचे अध्यक्ष युवराज तनपुरे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास व्हाईस चेअरमन संतोष पानसंबळ, संचालक दत्तात्रय गडाख, सखाराम कुमकर, आप्पासाहेब कोहकडे, आबासाहेब वाघमारे, ज्ञानदेव हारदे, संतोष तनपुरे, संतोष खांडगे, बाळकृष्ण पवार, विष्णू तारडे, अनिल शिंदे, सुनिता लहारे, शोभाबाई डुकरे, पुष्पाताई शेळके, आबासाहेब शेटे, धोंडीराम पवार, सुभाष डुक्रे रावसाहेब शेळके, मनोज लहारे, श्रीकांत शेजूळ,कांतीराम वराळे, बाळासाहेब आढाव, सचिन शिंदे, संदिप कडू, खरेदी विक्री संघाचे कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a reply