राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : अहमदनगर क्रीडा विभाग आयोजित पावसाळी स्पर्धात राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील म्हैसगाव येथील मुळा व्हॅली स्कुलने आज दिनांक 11-12 तारखेला क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला.कृषी विद्यापीठा येथे तालुका स्तरीय स्पर्धात आग्रेवाडी म्हैसगाव मधील विद्यार्थ्यांनी दोन्ही गटात बाजी मारली.
यामध्ये 14 वर्षे वयोगटात लांब उडी मध्ये कु.ज्ञानेश्वरी काकडे हीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कु.श्रावणी हारदे हीने पटकावले असून 17 वर्षे वयोगटात कु.अक्षदा शिंदे प्रथम व द्वितीय क्रमांकांचे बक्षीस पटकावले आहे.तर 14 वर्षे वयोगटात मुलांमध्ये 17 वर्षे वयोगटात लांब उडी मध्ये कु.समर्थ मैड,1500 मी धावण्याच्या शर्यतीत कु.अक्षय काळे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले.3000 मी धावण्याच्या शर्यतीत कु.सुरज गायकवाड तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले, तसेच 5 किमी धावण्याच्या शर्यतीत 17 वयोगटात कु.प्रसाद काळानर तर द्वितीय क्रमांकांचे कु.अथर्व गागरे यांनी पटकावला असून सर्व स्तरातून ह्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून या सर्व विजयी मुला- मुलींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी बजावणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या डॉ.उषाताई तनपुरे, संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष माने सर, सचिव सौ.रुपाली माने मॅडम, तसेच आग्रेवाडी मुळा व्हॅली स्कूलचे प्राचार्य श्री.विनोद म्हसे सर, क्रीडा शिक्षक सुशांत आरंगळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी म्हैसगाव येथील सर्व ग्रामस्थांनी विजयी झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे तोंडभरून कौतुक केले.
Homeक्रीडा / खेळमुळा व्हॅली स्कूलच्या विद्यार्थि व र्विद्यार्थ्यींनीचे तालुका स्तरीय स्पर्धात घवघवीत यश, जिल्हा स्पर्धेत निवड
मुळा व्हॅली स्कूलच्या विद्यार्थि व र्विद्यार्थ्यींनीचे तालुका स्तरीय स्पर्धात घवघवीत यश, जिल्हा स्पर्धेत निवड

0Share
Leave a reply