दक्षिण सोलापूर प्रतिनिधी / गजानन बंदीचोडे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याच्या वतीने ऊस परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते डॉक्टर संजीव माने व कारखान्याचे चेअरमन श्री महेश देशमुख संचालक पराग पाटील यूपीएल कंपनीचे डायरेक्टर अमर कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली यावेळी बोलताना संजीव माने म्हणाले की शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचा अवलंब केल्यास 100 ते१२० टन उसाचे उत्पादन शक्य आहे असे सांगितले ऊस लागवडी पासून तेीन महिने हा काळ महत्त्वाचा असतो या तीन महिन्यांमध्ये योग्य खतांची मात्रा व पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना श्री. महेश देशमुख म्हणाले की शेतकरी व कारखाना हे आपल्या गाडीचे दोन चाके आहेत शेतकऱ्यांनी चांगल्या वाणाचे उत्पादन घेऊन कारखान्याच्या व तयांचयाही उतपादनामधये उतपादनामधये वाढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे व शेतकऱ्यांचे आभार कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री दीपक नलावडे साहेब आभार मानले या कार्यक्रमाला कारखान्याचे वर्क्स मॅनेजर श्री श्रीकांत मोरे, श्री अखिल बीटे, श्री पदमराज साहेब , एच आर मॅनेजर श्री नंदकिशोर कदम साहेब कासिम शेख साहेब् प्रवीण आळगी सेक्युरिटी ऑफिसर श्री कासे साहेब हे यावेळी उपस्थित होते.
Leave a reply