Disha Shakti

इतर

समृद्धी’वरील १२ जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार ; भर रस्त्यात ट्रक थांबवल्याचा व्हिडीओ आला समोर

Spread the love

प्रतिनिधी / जितू शिंदे : समृद्धी महामार्गावर काल (रविवार) झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. तर २३ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांनी आरटीओने ट्रक कारवाईसाठी थांबवल्याने त्यांची गाडी ही सदरील ट्रकला धडकली असल्याचा आरोप केला होता. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

सदरील ट्रक चालकाच्या क्लिनरने गाडी थांबवली होती. हा व्हिडिओ तेव्हा या ट्रकच्या क्लिनरने काढला होता. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की ही गाडी तिसऱ्या लाईनमध्ये आरटीओ कडून थांबवण्यात आली. तर व्हिडिओमध्ये आरटीओची गाडी देखील दिसत आहे. व्हिडिओ बारकाईने बघितला तर या व्हिडिओमध्ये जी ट्रक थांबवली गेलेली आहे, ती ट्रक ही रस्त्याच्या एकदम मधोमध थांबवली गेलेली आहे. यामुळेच सदरील खासगी ट्रॅव्हल्स ही मागून येऊन धडकली.

जर आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ट्रक अडवला नसता, किंवा ट्रकला बाजूला घेऊन चौकशी केली असती, तर हा अपघात झाला नसता, असं अनेकांचं म्हणणं आहे. आरटीओच्या आधिकाऱ्यांच्या चुकीमुळे १२ प्रवाशांचा जीव गेला, असा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह एका चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरटीओला समृध्दीवर रस्त्यामध्ये गाडी थांबवण्याचा अधिकार नाहीये. त्यांना जर गाडी तपासायचीच असेल तर ती टोल नाक्यावर गाडी थांबून तपासता येते. मात्र या प्रकरणात गाडी भर रस्त्यात थांबून चिरीमिरीच्या अपेक्षेने ही गाडी थांबवली तर नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!