प्रतिनिधी / वसंत रांधवण : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर होते. अजित पवारांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे’चा शुभारंभ झाला. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. फटाक्यांची आतिषबाजी तसेच त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी बोलताना अजित पवारांनी आमदार निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली,कौतुक केलं. तसेच, आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर. आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं आहेत. कोरोना काळात केलेल्या लंकेंच्या कामाचा उल्लेखही पवारांनी यावेळी केला आहे. त्यासोबतच लंकेंच्या मतदारसंघात विविध विकासकामं करण्याचं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिलं आहे. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.
Leave a reply