Disha Shakti

सामाजिक

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू संघटनेच्या वतीने दुर्गा दौडने वेधले संपूर्ण राहुरीकरांच लक्ष

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या मार्फत आणि हिंदू ग्रुप राहुरी तालुका यांच्या सौजन्याने राहुरी शहरांमध्ये पहाटे सात वाजता दररोज नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा माता दौड चे आयोजन होत आहे. या दौडीला तीन वर्षाच्या लहान मुला मुलींपासून ते 60 ते 70 वर्षाच्या प्रौढ व्यक्तीपर्यंत तसेच अनेक महिलांचा देखील यात सहभाग असतो. अनेक महिला आपल्या हातात भगवा ध्वज घेऊन गर्वाने शहरांमध्ये भगवा झेंडा फडकवतात आणि त्याचे आउक्षण करतात. अनेक ठिकाणी रांगोळी काढून फुलहार अर्पण करून भगव्या ध्वजाची फेरी निघते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची नवीन तरुण पिढी तयार व्हावी देव देश धर्मासाठी त्यांचे काही ना काही योगदान असावे याकरिता तसेच अन्याय व अत्याचार रोखण्याकरिता महिलांनी कटिबद्ध असावे यासाठी ही फेरी असते.

हिंदू धर्माचा प्रचार करणे आपली संस्कृती जोपासणे तसेच लहान मुलांचा देखील यात सहभाग हिरीरीने सहभाग असतो. दुर्गामाता दौड शहरातील विविध भागांमधून नऊ दिवस निघत असते सकाळी दौड संपल्यानंतर नऊ वाजता १५-२० मिनिटं प्रबोधनात्मक आणि आत्मचिंतन करण्यासाठी काही ठराविक व्यक्तींचे भाषण देखील होतात.यात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाले आहेत या विषयावर देखील दौडी संपल्यावर भाषण दिले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज की जय ,भारत माता की जय ,छत्रपती संभाजी महाराज की जय, वंदे मातरम ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, साहित्यरत्न अण्णाभाऊ भाऊ साठे यांचा विजय असो महाराणा प्रताप शबरी माता, गुरुवर्य एकलव्य क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, रोहिदास महाराज , आहिल्यादेवी होळकर,प्रभू श्रीराम , बजरंग बली यांच्या नावाचा जयघोष करीत दुर्गा माता दौड ही पहाटे सहा वाजता विविध ठिकाणावरून दररोज निघत आहे. रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मंदिरामध्ये हार घालून नवरात्रातील नवदुर्गांचा जयजयकार केला जातो.

प्रथम दौड( पहिली माळ) ही मार्केट यार्ड राहुरी ते माळी गल्ली असा प्रवास होता यात प्रथम महिला नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी देखील झेंड्याला आउक्षन करून भगवा ध्वज हातामध्ये घेऊन मळगंगा मातेची पूजा केली. माहेरवासी असलेली तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये दुसरी माळ आरती आज समीर गुमास्ते आणि अनिल शेठ कासार यांच्या हस्ते झाली त्यानंतर पत्रकार अनिल देशपांडे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन तरुण तरुणींना केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!