जिल्हा प्रतिनिधी / युनूस शेख : विरोधात फिर्याद दिली म्हणून तरुणीच्या डोक्याला गावठी कट्टा लावत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस स्टेशनला तक्रार का दिली, असे म्हणून वाईट शिवीगाळ करून निघून गेल्या त्यानंतर रात्री 08.30 वाजेच्या सुमारास अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार, नामदेव बंडू पवार, अरुण रावसाहेब दळवी, अनिल रावसाहेब दळवी, तुषार अरुण दळवी, यांच्या हातात गावठी कट्टे होते. तसेच भागवत आहेर, गोविंद मधुकर पवार, प्रविण रावसाहेब वाघ यांच्या हातात कोयते होते व अजय संपत बर्डे यांच्या हातात धारदार तलवार होती. त्यावेळी माझ्या मुलांना अंकुश नामदेव पवार, अनिल रावसाहेब दळवी हे दोघेजण चापटीने मारहाण करत होते.
म्हणून मी त्यांना विचारले की, तुम्ही माझ्या मुलांना का मारहाण करता असे म्हणाल्याचा राग आल्याने अंकुश नामदेव पवार याने माझ्या पोटात लाथ मारून मला खाली पाडले. अंकुश पवार व दळवी यांनी असभ्य वर्तन केले. त्यावेळी अंकुश पवार मला म्हणाला की, तुझा नवरा व तू आमच्या विरुध्द दाखल केलेल्या गोळीबाराच्या व इतर केस मागे घे. नाही तर तुला आणि तुझ्या नवर्याला गोळ्या घालून जिवंत मारुन टाकू, अशी धमकी दिली.त्यावेळी माझा भाऊ तेथे आला. त्यावेळी त्यांनी माझ्या भावावर गावठी कट्टा रोखून आमच्यावरील केस मागे घ्या. नाहीतर तुम्हाला सर्वांना जिवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यावेळी माझ्या भावाने आरडाओरडा केल्याने ते तेथून निघून गेले.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार, नामदेव बंडू पवार, अरुण रावसाहेब दळवी, अनिल रावसाहेब दळवी, तुषार अरुण दळवी, भागवत रामड आहेर, गोविंद मधुकर पवार, प्रविण रावसाहेब वाघ, अजय संपत बर्डे सर्व रा. प्रगती शाळा परिसर यांच्या विरोधात भादंवि कलम 354, 143 147 148 149 447 323 504 506 आर्म अॅक्ट 25/3, 25/4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a reply