जिल्हा प्रतिनिधी /मिलींद बच्छाव : दिनांक 19/10/2023 रोजी श्री.दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा अंतर्गत यमुनाबाई प्रा. मा. व ज्युनियर कॉलेज नायगाव (बा) येथे शोध शास्त्रज्ञाचा या उपक्रमा अंतर्गत शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाचे उपजिल्हाधिकारी श्री सचिन गिरी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शिवराज पाटील होटाळकर साहेब (संस्थाअध्यक्ष तथा माजी शि. सभापती जि.प.नांदेड) होते.तर याप्रसंगी पंचायत समितीचे श्री काकडे साहेब गट शिक्षणाधिकारी,केंद्रप्रमुख श्री. शिवराज साधू सर,प्राचार्य मनोहर पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले मुख्याध्यापक श्री कोतेवार सर. मुख्याध्यापिका सौ पांडे एस.बी. श्री कल्याण सर, श्री रुपेश पवार सर श्री वडजे सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासकीय प्रमुख प्राचार्य फाजगे के. व्ही सरांनी मांडले तर सूत्रसंचालन श्री मोरे डी एम यांनी केलं व आभार श्री नकाते एन बी यांनी मांडले, या प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून श्री भोसले सर, श्री पिंपळदरे सर, सौ. वारखिंडे मॅडम यांनी केलं या विज्ञान प्रदर्शनात कला विभागासह प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर विभागातून एकूण 74 प्रोजेक्ट समाविष्ट होते. असंख्य विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान विभागाच्या वतीने श्री शेख सर, सौ. तगडपलेवार मॅडम, सौ. इंगोले मॅडम, सौ पैनापल्ले मॅडम ,श्री रेजितवाड सर व प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी केले, तर या विज्ञान प्रदर्शनाचे विभाग प्रमुख म्हणून प्रा. मोरे डी एम सर यांनी कामकाज पाहिले.
Leave a reply