दौंड प्रतिनिधी / नितीन पाटुळे : मौजे नाथाची वाडी येथील आवाळे वस्ती येथील १५व्या वित्त आयोगाच्या जि. प निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट कॉक्रेटीकरण रस्ता हा संबंधित ठेकेदार मनिष इंटरप्राइजेस श्री. बारवकर यांनी आर्धवट ठेवला, पैसे देखील घेतले आहे व तिथे काम पूर्ण झाले आहे असे फलक देखील लावले आहेत स्थानिक नागरिकांनी याची तक्रार बांधकाम विभाग दौंड व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी केली असता बांधकाम विभागाच्या अधिकारी बगाडे मॅडम यांनी स्थळ पाहणी देखील केली परंतु या गोष्टी ला देखील महिना उलटून गेला आहे कॉन्ट्रक्टर नागरिकांचे फोन देखील उचलत नाही यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैर सोय होत आहे.
हा रस्ता शेतकरी वर्ग व दूध व्यावसायिकंसाठी जास्त महत्वाचा मानला जातो रस्ता चालु होहून देखील या ठिकाणाहून जाता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनीं बांधकाम विभागाच्या अधिकारी बगाडे मॅडम व मनिष इंटरप्राइजेसचे श्री. बारवकर यांचे लागेबंध असुन या दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाण देखील झाली आहे असे आरोप देखील स्थानिकांनी केली आहे काम कधी पुर्ण होईल यांच्या प्रतीक्षेत स्थानिक ग्रामस्थ आहेत
दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी येथील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

0Share
Leave a reply