पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटीं यांनी मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर युवक संवाद मेळाव्याचे आयोजन केले असून त्यांच्या राजकीय भूमिकेला दसराचा मुहूर्त ठरला आहे. ज्या ठिकाणी आमदार निलेश लंके यांनी बाजार समिती लगतच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता त्याच मैदानावर विजयादशमीचा मुहूर्त साधून पारनेर तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत.त्यामुळे या दसराच्या मुहूर्तावर “युवक संवाद मेळाव्याच्या” माध्यमातून पारनेर तालुक्यातील तरुणाईशी संवाद साधणार आहेत.
या युवक संवाद मेळाव्याच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटी व माजी नगरसेवक नंदकुमार औटी हे पारनेरमध्ये शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत असून किमान तालुक्यातून १५ हजार कार्यकर्ते या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याचा आशावाद सुद्धा या औटी बंधूंनी व्यक्त केला आहे. पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक ला चलो रे ची भुमिका घेतली. मध्यंतरी महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी जवळीक वाढत चालली असल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा झडू लागली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पण भेट घेतली असल्याची चर्चा रंगली होती. परंतु अद्यापही त्यांच्या पक्षप्रवेशनाचा निर्णय प्रलंबित असून दसऱ्याच्या मुहूर्तावर युवक संवाद मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधून ते निर्णय घेणार असल्याची माहिती समजली आहे.
तर आगामी विधानसभा निवडणुक लढण्याच्या तयारीत माजी नगराध्यक्ष विजय औटी असून त्यांनी गावागावात जाऊन तरुणांशी संपर्क सुरू केला आहे. अनेक गावागावात वाड्यावर त्यांवर माजी नगराध्यक्ष विजय औटी यांचे तरुणाई कडून जोरदार स्वागत केले या युवक संवाद मिळाव्यात ते कुणाला लक्ष आपली भूमिका काय मांडतात याकडेही पारनेवासीयांचे लक्ष लागले आहे.
Leave a reply