श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील हयात असलेली व्यक्ती मतदार यादीत मयत दाखविली जावून नाव वगळल्याची घटना निदर्शनास आली. सदर व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही बाब समोर आली. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकार्याने नजरचुकीने नाव वगळले गेल्याचा दावा करून तातडीने नाव यादीत समाविष्ट करुन दुरूस्त यादी जाहीर करण्यात आली.
तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी अर्ज नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता. याच प्रक्रिये दरम्यान तालुक्यातील उंदिरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत अंकुश फकीरा बर्डे यांचा सरपंचपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. श्री. बर्डे जिवंत असताना मतदान यादीतून मयत घोषित करून यादीमध्ये क्र. 493 डिलीट असे लिहिण्यात आले. यामध्ये संबंधित कामगार तलाठी यांचा निष्काळजीपणा व नजरचुकीने जिवंत उमेदवार मृत घोषित झाला.
ही बाब निदर्शनास आल्यावर तहसीलदार यांनी संबंधित कामगार तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, ही घटना आ.लहू कानडे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने तहसीलदार श्री. वाघ यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्यास सांगितले. त्याप्रमाणे अंकुश बर्डे यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला.
नोंद करताना सांगितले 755 ऐकले 555
विधानसभेची 1 एप्रिल 2021 ची मतदार यादी होती. त्यानुसार ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय मतदार यादी बनविली होती. त्यावेळेच्या यादीत संबंधित व्यक्तीचे नाव समाविष्ट होते. संबंधित तलाठ्याकडून नवीन यादी बनविली गेली. त्यावेळी चुकीने त्यात ‘डिलीट’ अशी नोंद झाली. संगणकावर 755 क्रमांकाचा मतदार वगळण्यास सांगितले. मात्र नजरचुकीने 555 क्रमाकांचा मतदाराचे नाव डिलीट झाल्याचे निवडणूक अधिकार्यांनी सांगून याबाबत दुरूस्ती करुन नवीन यादी जाहीर करण्यात आल्याचे सांगितले.
HomeUncategorizedउंदिरगाव ग्रामपंचायतच्या उमेदवाराची मतदार यादीत ‘मृत’ म्हणून नोंद ; अधिकार्यांनी तातडीने केली दुरुस्ती
उंदिरगाव ग्रामपंचायतच्या उमेदवाराची मतदार यादीत ‘मृत’ म्हणून नोंद ; अधिकार्यांनी तातडीने केली दुरुस्ती

0Share
Leave a reply