दौंड प्रतिनिधी / नितीन पाटुळे : दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी या ठिकाणी माटोबा तलाव असुन राणी विक्टोरीया यांनी हा तलाव बांधलेला आहे या तलावाचा पाणी मोटरच्या सहाय्याने उपसा करून या परिसरातील शेतकरी वर्ग आपला शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे पण काही दिवसापासून यातलावामध्ये चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे.
दिनाक 21 ऑक्टोबरच्या मध्यरात्री देखील चोरी झाली या मध्ये शशिकांत बापु ठोंबरे, तुकाराम म्हाळु ठोंबरे, मल्हारी किसन हाके,आबा हाके बंडू, श्रीपती महारानोर. भानुदास लकडे या शेतकऱ्यांच्या केबल तसेच मोटरचे स्टारर्स चोरून नेले आहेत या सर्वं शेतकऱ्यांचे 60 ते 70 हजाराचे नुकसान झाले असुन शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे पोलीस प्रसासनाला ही कल्पना दिली असुन प्रसासनाकडून चोर शोधण्याचे आश्वासन दिले आहे.
दौंडमधील नाथाचीवाडी येथील माटोबा तलाववर शेतकऱ्यांच्या मोटारी व स्टाटरची चोरी ; शेतकरी त्रस्त

0Share
Leave a reply