राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्याच्या हालचाली काही पुढार्यांकडून सुरू आहेत.या प्रक्रियेला रिपाईकडून तीव्र विरोध करण्यात येत असून, याबाबत 6 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदन काल सोमवार दिनांक 23-10-2023 रोजी महसूल प्रशासनाला देण्यात आले.रिपाईचे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना निवेदनात देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शासनस्तरावर ग्रामीण रुग्णालय शहरापासून 5-6 किलोमीटर दूर नेण्याचा शासनाचा व नेतेमंडळींचा विचार आहे.ग्रामीण रुग्णालयासाठी शहरात मुबलक व योग्य अशी जागा असूनही काही स्वार्थी नेते ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्याच्या विचारात दिसतात.रुगणालय शहराबाहेर नेल्यास गोरगरीब रुग्णांची हेळसांड होणार आहे.त्यामळे ग्रामीण रुग्णालय नवीपेठ येथे आहे,त्याच जागी रहावे, अशी मागणी रिपाइंच्या आठवले गटाच्या वतीने करण्यात आली.अन्याथा रिपाइंच्या वतीने 6-11-2023 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे सर, तालुकाध्यक्ष सुनील चांदणे विवेक सगळगिळे, सागर साळवे, राजू दाभाडे, राजू बागुल, मयुर सुर्यवंशी, गणेश कोकाटे, अजीज इनामदार, रवींद्र शिरसाठ, दुर्गेश वाघ,आदी उपस्थित होते.
Leave a reply