Disha Shakti

राजकीय

श्रीरामपुरात सदस्यपदासाठी 338 तर सरपंचपदासाठी 36 उमेदवार रिंगणात

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार :श्रीरामपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या काल अर्ज माघारीच्या दिवशी सदस्यपदासाठी 338 तर 13 सरपंच पदांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. जाफ्राबाद, रामपूर, भैरवनाथनगर व गुजरवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

काल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भोकर येथे सदस्यपदासाठी 29 तर सरपंचपदासाठी 2, माळवाडगाव येथे सदस्यपदासाठी 21 तर सरपंचपदासाठी 2, निमगाव खैरी सदस्यपदासाठी 22 तर सरपंचपदासाठी 3, नाऊर येथे सदस्यपदासाठी 18 तर सरपंचपदासाठी 3, शिरसगाव येथे सदस्यपदासाठी 50 तर सरपचंपदासाठी 3, कान्हेगाव येथे सदस्यपदासाठी 14 तर सरपंचपदासाठी 2, खिर्डी येथे सदस्यपदासाठी 28 तर सरपंचपदासाठी 3, कडीत बुद्रूक येथे सदस्यपदासाठी 18 तर सरपंचपदासाठी 3, उंदिरगाव येथे सदस्यपदासाठी 37 तर सरपंचपदासाठी 3, दिघी येथे सदस्यपदासाठी 7 तर सरपंचपदासाठी 3, दत्तनगर येथे सदस्यपदासाठी 46 तर सरपंचपदासाठी 3, फत्याबाद येथे सदस्यपदासाठी 17 तर सरपंचपदासाठी 4, उक्कलगाव येथे सदस्यपदासाठी 31 तर सरपंचपदासाठी 2 असे सदस्यपदासाठी 338 तर सरपंचपदासाठी 36 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!