विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : गुरूवारी पंतप्रधान मोदी यांची शिर्डीला सभाt होणार होती. यासभेला नागरिकांना उपस्थित राहता यावे, यासाठी भाजपच्यावतीने एसटी महामंडळासह खासगी बसेस ठेवण्यात आल्या होत्या. दुसरीकडे मराठा आरक्षणावर चिडलेल्या समाज बांधवांनी या बसेसला आपले लक्ष करत अनेक ठिकाणी या बसेस अडवत त्या रिकाम्या करून तो सोडून दिल्या. श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर गावाने मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकला आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सर्व राजकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला. मातापूर ग्रामस्थांनी मोदींच्या सभेसाठी आलेली बस रिकामी पाठवली आहे .
एक मराठा लाख मराठा अशा घोषणा ग्रामस्तांनी दिल्या यावेळी अजिंक्य उंडे शुभाष शिरोळे ऐकनाथ साबळे उंडे महाराज मनोहर शिरोळे नामदेव दोंड दिलीप उंडे निखील शिरोळे अमोल उंडे या मातापूरच्या ग्रामस्थांनीही पंतप्रधान मोदींच्या सभेवर बहिष्कार घातला होता. येथे आलेली बसही रिकामी पाठविण्यात आली.
मोदींच्या सभेलाही मराठा आंदोलनाचा फटका ; श्रीरामपूर मधील मातापूर येथील ग्रामस्थांचा बहिष्कार

0Share
Leave a reply