शेख युनूस / अहमदनगर प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षण व तत्सम मागण्या संदर्भात श्री मनोज जरांगे पाटलांनी गेली अनेक दिवस अन्न व जल त्याग आंदोलन सुरु केले आहे.
वैज्ञानिक दृष्टीने जलत्यागाने शरीरावर कायम स्वरुपाचे घातक अपाय व उपद्रव होऊ शकतात. त्यांच्या भावना व हेतु जरी शुद्ध असेल तरीही त्यांनी हे संपूर्ण अन्न व जल त्याग आंदोलन येथुन पुढे चालू ठेवण्याचा त्यांनी पुनर्विचार करावा अशा मजकुराचे पत्र आरोग्य ग्राम जखणगांवचे लोकनियुक्त सरपंच तथा समाजपरिवर्तकार डाँ. सुनिल गंधे यांनी जरांगे पाटलांना पाठविले आहे.
यापुढे डाँ.गंधे म्हणाले आम्ही आपले हितचिंतक म्हणून आम्हाला आपल्या प्रकृती व जीवाची काळजी वाटते.
आत्मत्यागाने जर सकळ मराठा समाजाचे कल्याण होणार असेल व समस्त मानव जातीला उपयोग होणार असेल तर मी आपल्या समर्थनार्थ गुरुवार दिनांक दोन नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी सुर्यास्त समयी प्राणत्याग आंदोलन करणार आहे. हा निर्णय मी पुर्ण विचारा़ंती,कुणाचा दबाव व प्रभाव नसताना जनहितार्थ घेतलेला आहे.आपण आपल्या संपुर्ण अन्नपाणी त्याग आंदोलन पुढे चालू ठेवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आपण सुज्ञ,समजदार व मुत्सद्दी आहात. आपण माझ्या भावना व तत आवाहनाचा नक्कीच विचार कराल अशा विश्वासासह हे पत्र पाठवीले आहे.डाँ. सुनिल गंधे यांच्या या निर्णयाबाबत मनोज जरांगे पाटील आता काय भुमिका घेतात हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. डाँ. सुनिल गंधे हे पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचेबरोबर गेली ३० वर्ष सक्रिय आंदोलक म्हणुन कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या या आवाहनाला जरांगे पाटील काय भुमिका घेतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
जरांगे पाटलांनी अन्नपाणी त्याग आंदोलन चालू ठेवण्याचा पुनर्विचार करावा ! आरोग्य ग्राम जखणगांवचे लोकनियुक्त सरपंच डॉ.सुनिल गंधे यांचे भावनिक आवाहन

0Share
Leave a reply