विशेष प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील वनकुटे गावातील ग्रामस्थांच्या वतीने गाव कडकडीत बंद करण्यात आले व त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आज सकाळी 9 वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्व ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आह़े.
यावेळी वनकुटे गावातील भास्करराव शिंदे (माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य) डॉ.नितीन रांधवन, भानुदास गागरे, बाबाजी गागरे, ज्ञानेश्वर गागरे, काळे गुरुजी, कारभारी खामकर, संतोष केदारी, ऋषिकेश गागरे, निवृत्ती साळवे, सुरेश गागरे, भीमा मुसळे सर, बबन काळे, पाराजी बुचुडे, सुमनताई गागरे, बाळासाहेब लोणकर, गोपीनाथ गुंजाळ, संजय गागरे, बापू गागरे, रघुनाथ केसकर, दीपक खामकर, बाळू शिंदे, विजय वाबळे, संजय गागरे, बापू गागरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a reply