अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : जामखेड तालुक्यामधील धोत्री शिवारामध्ये कालीका पोदार इंग्लिश स्कूल या ठिकाणी शाळेलगत गॅस गोडाऊन खदान असल्यामुळे विद्यार्थ्यांयांच्या जिवीतवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी शाळेचे संबंधित व गॅस गोडाऊन मालक व संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अफसर शेख यांनी उपोषणास बसून केली आह़े.वरील विषयास व संदर्भाअनुसरून आपणास तक्रार अर्ज करतो की, जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारामध्ये कालिका पोदार इंग्लिश मिडीयम स्कूल असित्वात असून या शाळेमध्ये इ. १ ली ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये जवळपास ७०० विद्यार्थ्यांची संख्या आहे. या शाळेच्या लगतच भारत गॅस गोडाऊन आहे. तसेच खदान सुध्दा आहे.
या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्याच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो ही बाब नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचा जिवीताचा गांभीर्याने विचार करून शाळेसह गॅस गोडाऊन खदान संचालक व तसेच चुकीचा अहवाल सादर करणान्या केंद्र प्रमुख विस्तार शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी जामखेड या अधिकाऱ्यांची ही सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते अफसर शेख यांनी केली आह़े. ते दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 पासून जिल्हापरीषद कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषणास वसलेले असून या प्रकरणी योग्य दखल न घेतल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे अफसर शेख संस्थापक अध्यक्ष मानव विकास परिषद भारत यांच्यावतीने सांगण्यात आले आह़े.
धोत्री येथे शाळेच्या लगत असलेल्या भारत गॅस गोडाऊन खोदकामा विरोधात कारवाई करण्याची अफसर शेख यांची मागणी

0Share
Leave a reply