Disha Shakti

राजकीय

रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक अहमदनगर शासकीय विश्रामगृहात संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्याचे नवनिर्वाचित राज्य प्रमुख काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान बचाव यात्रा रथ संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असुन त्याची सुरवात दि 24 /10 /2023 रोजी नागपुर दिक्षाभुमी येथून बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू इंदू मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते ऊदघाटन करण्यात आले आहे. त्या संविधान बचाव यात्रा रथाचे आगमन अहमदनगर मध्ये दि 11 /11 /2023 रोजी होणार आहे त्या निमीत्ताने जिल्हा शाखेच्या वतीने अहमदनगर शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख राजू आढाव जिल्हा महासचिव अशोक गायकवाड संघटक काशिनाथ चौगुले ऊपप्रमुख भारत भांबळ पाथर्डी प्रमुख बाबासाहेब रंधवे शेवगाव प्रमुख वसंतराव साबळे नेवासा प्रमुख आदिनाथ भालेराव नगर ता.प्रमुख राजू पाटोळे जामखेड प्रमुख बनसोडे ऊपप्रमुख बबन गव्हाळे संघटक बाळासाहेब गायकवाड नेवासा संघटक आंबादास गाडे राहूरी ऊपप्रमुख भानुदास जाधव शाखा प्रमुख विशाल खरात श्रीरामपूर ऊपप्रमुख संजय अमोलीक इ.उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!