विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील खडका फाटा ते नेवासा दरम्यान दोन प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सव्वादोन लाख रुपये किमतीचा माल लुटणार्या टोळीतील तिघा सराईत आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून फिर्यादीच्या आधारकार्डसह सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत माहिती अशी की, तुषार हरीभाऊ राहिंज (वय 21), रा. शिरापूर आर्वी, ता. शिरुरकासार (जि. बीड) व साक्षीदार हे पैसे घेवून त्यांचे नातेवाईकांकडे जाताना खडका फाटा ते नेवासा रोडवर लघुशंकेसाठी थांबलेले असताना अनोळखी 8 ते 9 पुरुष व एका महिला आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील 2 लाख 24 हजार 200 रुपये किंमतीचा माल दरोडा चोरी करुन घेवून गेले होते. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे तपास सोपवला असता पथकाने रेकॉर्डवरील आरोपींचे फोटो फिर्यादीला दाखवले असता दोघांना ओळखले. त्यानंतर सदर आरोपी प्रशांत ऊर्फ पप्पु रजनीकांत भोसले (वय 29), विक्रांत रजनीकांत भोसले (वय 27), सतिष विनायक तांबे (वय 39) सर्व रा. बुरुडगाव रोड, ता. नगर या तिघांना जेरबंद करण्यात आले. त्यांनी त्यांचे इतर साथीदार जनक चव्हाण (फरार), रमेश चव्हाण (फरार), शिवम शिवाजी चव्हाण रा. वाळकी ता. नगर (फरार), कविता पप्पु ऊर्फ प्रशांत भोसले रा. बुरुडगाव (फरार), निलेश बाबुशा पवार (फरार), लखन कांतीलाल पवार (फरार), धिरज कांतीलाल पवार अशांनी मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली.
ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन 5 लाख रुपये किंमतीची शेव्हरलेट कंपनीची कॅप्टीव्हा ही गुन्हा करताना वापरलेली कार, 5 हजार रुपये रोख, 22 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व फिर्यादी यांचे आधारकार्ड असा एकुण 5 लाख 27 हजार रुपये किंमतचा मुद्देमालताब्यात घेवून नेवासा पोलीस ठण्यात हजर केले.पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी प्रशांत ऊर्फ पप्पु रजनीकांत ऊर्फ रजिकर्या भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द अहमदनगर, बीड, ठाणे, पुणे, हिंगोली व वाशिम जिल्ह्यात खुनासह दरोडा, दरोडा तयारी, मोक्कयासह दरोडा व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत.
प्रवाशांना लुटणार्या टोळीतील तिघे सराईत आरोपी जेरबंद ; सव्वापाच लाखाचा मुद्देमाल जप्त

0Share
Leave a reply