नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : अल्पवयीन मुलीला व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामव्दारे मेसेज करून त्रास देणार्या युवकाला कोतवाली पोलिसांनी भिंगार वेस येथून ताब्यात घेत जेरबंद केले आहे. सर्फराज बाबा शेख (वय 23 रा. आलमगीर, भिंगार) असे त्याचे नाव आहे.
अल्पवयीन मुलगी (मूळ रा. बुलढाणा) हीच्या फिर्यादीवरून 30 ऑक्टोंबर 2023 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. शेख हा अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर मेसेज करून त्रास दिला होता. तसेच जीवे मारून टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी विनयभंग पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना शेख हा भिंगार येथे वेशीमध्ये बसलेला असल्याची माहिती कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, इस्त्राईल पठाण, अभय कदम, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, राहुल गुंडू, राजेंद्र वाघ, रवी कर्डीले, विशाल दळवी यांच्या पथकाने केली आहे.
Leave a reply