Disha Shakti

राजकीय

भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांची अहमदपूर विधानसभा निवडणूक प्रमुख २०२४ पदी नियुक्ती

Spread the love

लातूर जिल्हा प्रतिनिधी / नंदाराज पोले  (अहमदपूर) : भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख असणारे भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके यांच्या वरती पक्षाने नवीन जबाबदारी सोपवली आहे.गणेश दादा हाके यांची महाविजयी २०२४ अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले.

भाजपाचे नेते गणेश दादा हाके यांची पक्षांमध्ये स्वच्छ प्रतिमा असलेला नेता म्हणून ओळख आहे. स्वार्थासाठी पक्षा सोबत गद्दारी कधी केली नाही. पक्षाशी प्रमाणिक राहुन पक्ष वाढीसाठी योगदान दिले. याचबरोबर उच्चशिक्षित, नेते म्हणून गणेश दादा हाके यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे.त्यामुळे गणेश दादा हाके यांच्या वरती पक्ष वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवत असते अशातच आणखी एक नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व कायम राहील असा विश्वास भाजपचे नेत्यांमध्ये आला आहे.

या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मा.आ. बब्रुवान खंदाडे , प्रदेश उपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा अशोक केंद्र, त्र्यंबक गुट्टे, माजी सभापती भारत चामे,ता. अध्यक्ष प्रताप पाटील, वसंत दिघोळे ता.अध्यक्ष भाजपा चाकूर मा.ता.अध्याक्ष हानुमंत देवकत्ते, हेमंत गुट्टे, डॉ सिध्दार्थ कुमार सूर्यवंशी, नितीन रेड्डी, बालासाहेब होळकर, बबलू पठाण, माणिक नरवटे, परशुराम सरनर,नाना नरवटे, नंदराज पोले, गणेश नरवटे,अंतेश्वर तुडमे,सर्व भाजप कार्यकर्त्यांनी गणेश दादा हाके यांचे अभिनंदन केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!