प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन दिवस व दक्ष स्वयंसेवक फौंडेशन महाराष्ट्र राज्य सभासद श्री.दिपक शेळके सर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सामाजिक उपक्रम सेयान इंटरनॅशनल स्कूल व योगीराज बालविकास मंदिर ताहाराबाद ता.सटाणा जि.नाशिक येथे घेण्यात आला.
वृक्षारोपण उपक्रम घेताना प्रथम विद्येची जननी,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्कूल चे मुख्याध्यापक मा.श्री लिबीन सबास्टीयन (sabastian) सर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व वृक्षारोपण करण्याला सुरुवात करण्यात आली. स्कूलचे मुख्याध्यापक सर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण बद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी उपस्थित स्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री आर.एच.शेख सर,दक्ष स्वयंसेवक फौंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.विठ्ठल ठोंबरे, उपाध्यक्ष श्री.ऍड.अमोल रंजाळे, शिक्षक सचिन चौधरी, कुणाल खरे, असिफ शेख, रवींद्र देशमुख, शिक्षिका जयश्री देशमुख, मंगला आहेर, मनिषा खेडकर, मनिषा जाधव, धनश्री पगारे, पूनम पवार, पायल जैन, सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी वृक्षारोपण केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
दक्ष स्वयंसेवक फौंडेशन सभासद श्री.दिपक शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न

0Share
Leave a reply