Disha Shakti

सामाजिक

26,व 27 नोव्हेंबर रोजी जेजुरी येथे मौर्य क्रांती महासंघाच्या धनगर जागृती परिषदेमध्ये धनगर बांधवांनी सहभागी होण्याचे भारत कवितके यांचे आवाहन

Spread the love

 मुंबई कांदिवली. प्रतिनिधी / भारतक वितके : रविवार दिनांक 26 व सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी दोन दिवसीय मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने जेजुरी येथे राज्यस्तरीय धनगर जागृती परिषदचे आयोजन करण्यात आले आहे असे राजीव हाके, प्रदेश अध्यक्ष मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे व समस्त धनगर बहुजन समाजाला परिषद ला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे,तर धनगर जागृती परिषदमध्ये सहभागी होऊन ऐतिहासिक साक्षीदार होण्याचे आवाहन मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक भारत कवितके यांनी धनगर बांधवाना केले आहे.

धनगर समाजातील सर्व संघटना,गट तट,जाती उपजाती शाखा उपशाखा यांना एकत्र करण्याचे काम मौर्य क्रांती महासंघाने आज पर्यंत केले आहे. प्रबोधन, प्रशिक्षण, प्रोत्साहन, प्रतिनिधीत्व, आणि नेतृत्व या निती तत्वाच्या आधारे सामाजिक, वैचारिक, आणि लक्षवेधी जागृती करणारे संघटन म्हणजेच मौर्य क्रांती महासंघ होय.

या परिषदेच्या निमित्ताने जेजुरी या ठिकाणी रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी गजनृत्य, धनगर ओवी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तर सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी धनगर बहुजन समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर मग तो आरक्षण अंमलबजावणी असो,जात निहाय जनगणना असो, ओबीसी समुहाच्या हक्क अधिकारचा असो, रानावनात हिंडणार्या मेंढपाळ बांधवांचा असो, धनगर बहुजन समाजातील अगदी शेवटच्या माणसापर्यंतची चर्चा असो, याबाबत परिषदेच्या निमित्ताने मल्हार गड जेजुरी येथे होत आहे.

या परिषदेत महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक भारत कवितके यांनी केले आहे.

भारत कवितके मुंबई कांदिवली मोबाईल नंबर 8652305700


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!