Disha Shakti

क्राईम

नगरमध्ये १ कोटीची लाच घेताना सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात ; १ कोटीचे पाचशेच्या नोटांचे बंडल जप्त…

Spread the love

नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : नगर एमआयडीसी मध्ये संभाजीनगर येथील एका शासकीय ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी व मागील काढलेले बील यासाठी एक कोटीची लाच मागितली. याप्रकरणी काल नगर शहरात नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत आनंद बिल्डिंग जवळ इनेव्हा गाडी नंबर एम.एच. २० सीआर. ७७७७ या गाडीत १ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना साक्षीदार व पंचासमक्ष नगर एमआयडीसीचा लाचखोर सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड याला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

याप्रकरणी काल नगर एमआयडीसी पोलिसात शासकीय ठेकेदाराने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी लाचखोर अमित किशोर गायकवाड, वय-३२, सहाय्यक अभियंता वर्ग- २ महाराष्ट्र, राहणार- आनंद विहार, नागपूर मुळराहणार- चिंचोली, तालुका राहुरी तसेच गणेश वाघ तत्कालीन उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभाग नगर या दोघांविरुद्ध भादवि कलम भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७(अ)१२ , ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विश्वास नांगरे पाटील व नाशिक विभागाच्या लाचलुचपत अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या पथकाने तसेच पोनि.राजपूत यांच्या टीमने ही कामगिरी केली. पुढील तपास सपनि सानप हे करीत आहे.

दरम्यान अमित गायकवाड या लाचखोर अभियंत्याने लाच मिळाल्यानंतर त्याचा साथीदार गणेश वाघ याला फोन करून सांगितले की रक्कम मिळाली आहे, ५० टक्के कुठे पोहोच करायची तेव्हा वाघने गायकवाडला सांगितले की, तुझ्याकडे सेफ कस्टडी ठेव तेव्हा गायकवाड म्हणाले एकच पाकीट आहे सध्या ठेवून दे असे गणेश वाघ गायकवाडला म्हणाला व वाघ यांनी गायकवाड याला लाज स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. या घटनेने एमआयडीसी मध्ये सुद्धा सरकारी अधिकारी किती प्रचंड भ्रष्टाचार करतात हे उघड झाले असून काही सरकारी अधिकारी फक्त भ्रष्टाचार करून पैसे कमविण्यासाठीच नोकऱ्या करतात असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. आरोपी गणेश वाघ याच्या सहया घेवून मागील तारखेचे आऊट वर्क करून सहाय्य घेवून देयक (बिल) पाठविण्यासाठी गायकवाड ने त्याच्या स्वतः साठी व वाघ साठी १ कोटी रुपयांची लाच मागीतली होती.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!