इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्रजी पवार गट ) पार्टीच्या पुणे जिल्हा प्रवक्तेपदी जेष्ठ पत्रकार दादासाहेब माणिकराव थोरात यांची निवड करण्यात आली असुन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, इंदापुर तालुकाध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे सुपुत्र उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे विचार महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आरक्षणाचे धोरण, महिला धोरण आणि शेतीचे धोरण जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या बरोबरच संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शाखाली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि भाजपाची लबाडी जनतेत नेहण्याचे काम आमदार रोहित पवार यांच्या सहकार्याने करणार असल्याचे यावेळी बोलताना नवनियुक्त पत्रकार दादासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा प्रवक्तेपदी जेष्ठ पत्रकार दादासाहेब माणिकराव थोरात यांची निवड

0Share
Leave a reply