विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : भंडारदरा धरणाच्या आवर्तनातून श्रीरामपूर व बेलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
साठवण तलावातील पाणी संपले
श्रीरामपूर नगरपरिषदेअंतर्गत जवळपास एक लाख तसेच बेलापुरची ४० हजार लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्हीही पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणी संपले आहे. नगर परिषद व बेलापूर गरम पंचायतीने साठवण तलावात पाणी सोडनेबाबत जलसंपदा विभागाकडे मागणी नोंदविलेली आहे. सध्या दिवाळीचा सण तोंडावर आला असून या काळात पिण्याचे पाणी मिळाले नाही तर या दोन्ही गावांना भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे.त्यामुळे अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दोन्ही साठवण तलावात तातडीने पाणी सोडण्याच्या सुचाना द्याव्यात, अशी मागणी आमदार कानडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
भंडारदरा धरणाच्या आवर्तनातून साठवण तलावात पाणी सोडण्याची आमदार लहू कानडे यांची मागणी

0Share
Leave a reply