विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल हाती आला आहे. गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये अंतिम लढत झाली. या रोमहर्षक लढतीत सिकंदर शेखने शिवराज राक्षेला आस्मान दाखवत ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिंकदर शेख अंतिम फेरीत दाखल झाला होता. तर तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला धुळ चारत शिवराज राक्षेने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सिकंदर शेख आणि शिवराज राक्षेमध्ये झालेल्या लढतीत शिवराज राक्षेला आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
अवघ्या २३ सेकंदाच्या लढतीत सिकंदरने बाजी मारली. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखला सेमी फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. मात्र यंदा त्याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावत आपणच कुस्तीचा किंग असल्याचे सिद्ध केले आहे.
दरम्यान, या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे 42 संघ भिडले. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी झाले होते. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग होता.
Leave a reply