राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : 12 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान रथ राहुरी शहरांमध्ये सकाळी दहा वाजता येणार असून या रथाचे स्वागत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन सेनेचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेबांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हजर राहणार आहेत तरी सर्व संविधान प्रेमींनी रविवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता सविधान रथाच्या स्वागतासाठी उपस्थित राहून या क्रांतिकारी दिनाचे साक्षीदार व्हावे.
कारण आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय किरण भाऊ घोंगडे हे मार्गदर्शन करणार आहेत तरी जिल्ह्यातील रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन युवा सेना ,रिपब्लिकन कामगार सेना रिपब्लिकन विद्यार्थी सेना ,रिपब्लिकन महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे रिपब्लिकन सेना राहुरी शहर प्रमुख दत्ता जोगदंड यांनी आवाहन केले आहे
Leave a reply