Disha Shakti

इतर

राहुरी नगरपरीषदेने दिव्यांगाना 5% निधी देऊन दिवाळी केली गोड

Spread the love

राहुरी प्रतिनिधी  /  प्रमोद डफळ  – माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपरीषदेने दिव्यांगाचा दिवाळी निमित्त 5% निधी वाटप करण्यात आला. आठ दिवसापुर्वी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या मागणी नुसार राहुरी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब यांनी दिव्यांगाच्या खात्यात 5% निधी दिवाळीच्या अगोदर दोन दिवस जमा केला. दिव्यांगाच्या टक्केवारी नुसार तीन टप्यात निधी वर्ग करण्यात आला. त्यामुळे राहुरी शहरातील दिव्यांग बांधवांच्या दिवाळीच्या निमित्ताने निधी भेटल्याने दिव्यांगाची दिवाळी गोड झाली सर्वांनी समाधान व्यक्त केले. आपल्या राहुरी नगरपालिकेने 2016 पासून दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून माजी नगराध्यक्ष डॉ. उषाताई तनपुरे व माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात राहुरी नगरपालिकेच्या उत्पनातून दिव्यांगाचा 5% निधी दरवर्षी वाटप केला जातो.

दीपावली हा सर्वात मोठा सण असून दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश लबडे शहराध्यक्ष जुबेर मुसली यांच्या मागणीनुसार दिवाळीच्या अगोदर दिव्यांगाचा 5% निधी वाटप करण्यात आला. यावेळी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे खजिनदार सलीमभाई शेख, राहुरी दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या सचिव सौ. छायाताई हारदे, दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव शिंदे सर, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी, कार्याध्यक्ष संजय देवरे, महिला शहराध्यक्ष अनामिका हरेल मॅडम यांनी आमदार प्राजक्त दादा तनपुरे व राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे साहेब, ग्रंथपाल आप्पासाहेब तनपुरे यांचे आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!