श्रीरामपूर प्रतिनिधी / गणेश राशीनकर : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील रहिवासी असलेले शेतकरी कुटुंबातील बाबुराव किसन भवार (वय५६) या शेतकऱ्याने आपल्या स्वतःच्या मालकीच्या गट नं ४४ मधील शेतामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली असून अद्याप आत्महत्या करण्याचे कारण कळालेले नसून श्रीरामपूर – निगांव खैरी रोड लगत जाफराबाद शिवारामध्ये चारी नं.२० च्या जवळच गट नं ४४ नाऊर पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शेतात मयत श्री. भवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने ऐन सणासुदीच्या काळात अचानकपणे आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आह़े.
परंतु त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप समजले नसुन पुढील तपास तालुका पोलिस करत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशनमध्ये ५३/२०२३ अन्वये या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करप्यात आली आहे.
ऐन दिवाळीत नाऊर येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

0Share
Leave a reply