Disha Shakti

क्राईम

घोडेगाव सोनई चौक येथे दारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील घोडेगाव सोनई चौक येथे मंगळवार (14 नोव्हेंबर) रोजी दुपारी 2.30.च्या सुमारास दारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी रामदास जाधव घरी असतांना आरोपीत निलेश मधुकर केदारी (रा. घोडेगाव) हा विनानंबरची स्प्लेंडर मोटारसायकलवर घरासमोर आला व फिर्यादीस दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करु लागला.

फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी केदारी याने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या दुचाकीने धडक दिली. तेव्हा दोघेही खाली पडल्याने किरकोळ दुखापत झाली.आरोपीने उठुन फिर्यादीस तुझ्यामुळे मला लागले आहे असे म्हणुन फिर्यादीस मारहाण करत खिशातील 5200 रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच आरोपीने गावठी कट्टा काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी 494/2023 भा.द.वि.327, 323, 504, 506 आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस. हे. कॉ. एम. आर. आडकित्ते हे करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!