बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : रामायणाचे रचनाकार, आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी समाज मंदिराचे आज बिलोली तालुक्यातील कासराळी येथे नियोजित जागेवरती समाजाच्या निधीतून कंपाउंड वॉल चे भूमिपूजन करण्यात आले. सर्वप्रथम श्री गणेशाच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून श्री गणेशा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मा.जि.प.सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड,सोमलिंग पा.कासराळीकर, मा.जि.प.सदस्य संग्राम पा. हायगले,पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार, सरपंच शेषराव लंके, बसवंत पाटील,शिवा पाटील कासराळीकर,भागवत सावकार लोकमनवार, विठ्ठल पाटील शिंदे, शेषराव गज्जोड, शिवानंद सोमासे,मारोती भुरे माधव दंत्तापल्ले, प्रकाश गंगुलवार, साईनाथ गंगुलवार, बासीद कुरेशी, बळीराम यमुलवाड,भागन्ना कमलू, गजानन कोटपलवाड, शंकर वदुलवाड, तसेच महादेव कोळी समाज बांधव गावातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
कासराळी येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी समाज मंदिराचा कंपाउंड भिंतीचे भूमिपूजन संपन्न

0Share
Leave a reply