Disha Shakti

सामाजिक

आरक्षण संदर्भात शासनाची आश्वासने संभ्रम निर्माण करणारी – ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक भारत कवितके

Spread the love

दिशाशक्ती मुंबई प्रतिनिधी / भारत कवितके : आरक्षण संदर्भात शासनाने दिलेली आश्वासने संभ्रम निर्माण करणारी वाटत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक भारत कवितके मुंबई यांनी एका मुलाखतीत केले.पुढे भारत कवितके म्हणाले, ” मराठा समाज, धनगर समाज,व ओबीसी हे आरक्षण संदर्भात आमरण उपोषण, साखळी उपोषण, रस्ता रोको, धरणे आंदोलन, एल्गार मोर्चा, कडकडीत बंद,वगैरे वगैरे मार्गाने आंदोलन करीत आहेत.

आरक्षण संदर्भात शासनाने दिलेली आश्वासने मुदत संपली तरी पूर्ण करण्यात आली नाहीत . मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देऊ,पण थोडा वेळ लागेल, धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबत शासनाने समिती स्थापन करून नक्कीच आरक्षण अंमलबजावणी करु, ओबीसी च्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ.मुख्यमंत्री ठामपणे सांगतात कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता कोर्टात, कायदेशीर रित्या आरक्षण देऊ,पण मराठा समाजाला आरक्षण संदर्भात,व धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबत शासनाने दिलेली आश्वासने हवेत विरून गेली.

आता मराठा समाज व ओबीसी एकमेकांच्या विरोधात सभा घेणे, पोस्टर बाजी करणे,या वरुन महाराष्ट्र राज्यातील वातावरण अस्थिर झाल्याचे जाणवत आहे.शासनाने ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आरक्षण संदर्भात लवकरच आपली योग्य ती पूर्तता करावी.महाराष्ट्र राज्यातील ही आरक्षण समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे, मध्यंतरी शिर्डी येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आरक्षण संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.महाराष्ट्र राज्य आरक्षण संदर्भात एक ब्र शब्दही काढला नाही.आंतर राष्ट्रीय पातळीवर धडाडीचे निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षण वर बोललेच नाही, त्यांनी या बाबत बोलायला हवे होते हे सर्वांचे मत होते.

शासनाने ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आरक्षण संदर्भात लवकरच आपली योग्य ती पुर्तता करावी.अशा परिस्थिती मध्ये समाज कंटक फायदा घेतील, दंगली घडवतील,कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे काम करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.”


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!