विशेष बातमी / इनायत अत्तार : श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर वडाळामहादेव परिसरात झालेल्या अपघातात डंपर उलटून यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यु झाला आह़े.तसेच या अपघातात डंपर चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली असून त्याच्यावर पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून सद्या त्यावर उपचार चालू आहेत.
या अपघातात सोमनाथ रंगनाथ माळी (वय ३०, रा. वांगी, ता. श्रीरामपूर) या तरुणाचा जागीच मृत्यु झाला आहे. सदरील डंपर चालक सुरेश सुकदेव पवार (वय २८, रा. टाकळीभान) हे या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस तात्काळ दाखल होऊन पुढील कार्यवाही चालू आह़े. या घटनेनंतर या ठिकाणी मोठ्या नागरिक जमा झाले असून त्यांनी तत्काळ चालक पवार यांना बाहेर काढले व उपचारासाठी पाठवले तसेच माळी हे डंपरखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आह़े. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई चालू आह़े.
Leave a reply