नांदेड जिल्हा प्रतिनिधी/मिलिंद बच्छाव : गेल्या अठरा वर्षांपूर्वी आपण शाळा सोडल्यानंतर कुठे आहोत काय करीत आहोत देशासाठी समाजासाठी व गरजूंसाठी आपले योगदान महत्त्वाचे असणे गरजेचे आहे यासाठी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असलेले नायगावचे भूमिपुत्र प्रदीप पाटील जांभळे आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांनी गेट-टुगेदर या कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमात नवा संकल्प घेऊन मार्गक्रमण करण्यासाठी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी निर्धार केला आहे.
नायगाव शहरातील कुसुम लॉज सभागृहात आयोजित केलेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी जनता ज्युनिअरचे प्राचार्य के जी सूर्यवंशी यासह प्राध्यापक सोमावार व गजानन पाटील चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले असून प्रस्ताविक जावेद सय्यद यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात के जी सूर्यवंशी म्हणाले की मित्रत्वाचे नाते जपून ठेवा, काळ आणि वेळ ओळखून आपण पावले टाकावी, देशासाठी समाजासाठी व दिनदुबळ्या लोकांसाठी चांगले काम करावे असे सांगत आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरभरून शुभेच्छा दिले आहेत.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तर अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगत कविता व आपल्या मनातील भावना व्यक्त याप्रसंगी केले आहेत तर मी स्वतःला समाजाचा एक अविभाज्य भाग समजून शपथ घेतो की मी आपल्या समूहात राहुन सामाजिक बांधिलकी कायम जपत राहील मित्रत्वाचा तसेच मानवतेचा खरा अर्थ म्हणजेच कठीण प्रसंगी मदतीला धावणे तोच सार्थकी करण्याचा ऑटोकॉट प्रयत्न करीन, माझ्या वागण्याने किंवा बोलण्याने जाणीवपूर्वक कोणी दुखावणार नाही याची काळजी घेईन समाजाच्या सांस्कृतिक पुनरूत्थांची तथा भारत देशाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे याची जाणीव बाळगून मी सतत मानवतेचा आणि मित्रत्वाचा मान सन्मान करीत राहीन अशी सामूहिक शपथ सर्वांनी यावेळी घेतली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन सुजलेगावकर तर आभार मलिकार्जुन मठपती यांनी मांनले आहे.
यावेळी पवन गादेवार, बालाजी नारे, कैलास भालेराव, पप्पू शिंदे, संतोष शिंदे, शंकर वडजे, कैलाश पवार, आनंद नकाते, सुनील पतके, गणेश लोहगावकर, शिवाजी चव्हाण, विकास गोपछडे,अंकित भोसले, शिवराज आणेराये ,कैलास पांडे, मिलिंद मांजरमकर, सतीश बेंद्रीकर, दिनेश कदम, उल्हास गबाळे, माधव आणेराये,सिताराम भोसले, रविराज आणेराये ,स्वाती पाटील, अश्विनी कदम, उषा धनंजे, वर्षा डोईवाड, चिराग एडके, भास्कर सज्जन, संतोष घोडके, सय्यद रियाज यासह विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मोठा सहभाग होता.
Leave a reply