इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : सोमवार दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी कँडल मोर्चाचे आयोजन केले होते. या कँडल मोर्चा साठी सिद्धेश्वर निंबोडी गावातील सर्व मराठा समाज एकवटला होता. गट, भाडणे, राजकीय पक्ष इत्यादी सर्व विसरून सर्व समाज मराठा आरक्षणासाठी एकवटला होता. या कँडल मोर्चा मध्ये महिला, तरुणी, तरुण, लहान मुले व वयवृढ सर्वच समाज सिद्धेश्वर निंबोडी गावातील महादेव मंदिरासमोर एकत्र आले व त्यानंतर पूर्ण गावातून कँडल मोर्चा काढण्यात आला.
यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, संघर्षयुद्ध मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हे साथ है, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी गाव दणाणून गेले.याद्वारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे आता पूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण का गरजेचे आहे व ते कसे मिळवता येईल यासाठी मराठा समाजात जनजागृती करत आहेत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कॅण्डल मोर्चाचे सिद्धेश्वर निंबोडी मद्ये आयोजन करण्यात आले होते.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी अजित धुमाळ, कृष्णा मोहिते सर, भूषण जाचक, राजेंद्र धुमाळ, धनंजय धुमाळ , शंकर कनेरकर इत्यादींनी परिश्रम घेतले