विशेष प्रतिनिधी/इनायत अत्तार (श्रीरामपूर) : दि. 21/11/2023 रोजी डी वाय एस पी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, ममदापूर गावातून एका पांढरे रंगाचे स्विफ्ट डिझायर कार मधून गोवंश जातीचे जनावराचे मांस विक्रीकरिता घेऊन जात आहे. त्याबाबत आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी बाभळेश्वर ते श्रीरामपूर जाणारे रोडवर बाभळेश्वर शिवारात विद्या विकास शाळेसमोर रोडवर सापळा रचून थांबले असताना श्रीरामपूर कडून एक संशयित पांढरे रंगाची स्विफ्ट कार येताना दिसली
पोलीस व पंचांची खात्री होताच सदर वाहन चालकाला हात दाखवून गाडी थांबवण्याच्या इशारा करता त्यांनी वाहन थांबविले त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव सालीम निसार मणियार वय 21 रा. मंगळवार पेठ मोमीन गल्ली जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे असे सांगितले त्याचे ताब्यातील डिझायर कारची पाहणी करता त्यामध्ये गोवंश जातीचे जनावराचे मांस असल्याचे खात्री झाल्याने कार चालक आणि स्विफ्ट डिझायर कार नंबर MH 42 AV 43 वाहनांमध्ये गोवंश जातीचे जनावरांचे 500 किलो मांस ताब्यात घेऊन सदर चालका विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 672/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 (सुधारित2015) चे कलम 5(अ).5(क).9(अ)9(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डी.वाय एस पी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक शिंदे, श्याम जाधव, असीर सय्यद, हे.कॉ.जोसेफ साळवी यांनी केली आहे.
500 किलो गोमांससह स्विफ्ट डिझायर कार जप्त, साडे सात लाखाच्या मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात ; डि.वाय.एस.पी.संदीप मिटके यांचे पथकाची कारवाई

0Share
Leave a reply