नांदेड जिल्हा प्रतिनिधी/मिलिंद बच्छाव : नायगाव येथील भारत कॉटन जिनिग प्रेसिंगमध्ये शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला अर्थात कापूस खरेदीला २१ नोव्हेंबर रोजी प्रारंभ करण्यात आला.शुभारंभाला ७ हजार ३११ हमीभाव काढण्यात आला. प्रथम कापूस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा स्व.
डी.बी.पाटील कॅम्पस मधील भारत कॉटन च्या माध्यमातून अध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकरांनी सन्मान करून तमाम शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर कापूस आणण्यासाठी होटाळकरांनी आवाहन केले.
भारत कॉटन जिनिगचे संस्थपाक स्व. डी. बी. होटाळकर यांच्या माध्यमातून भारत कॉटन आग्र सुरुवात झाला दर वर्षी प्रमाणे कापूस खरेदीचा शुभारंभ दि. २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आला.कापूस खरेदीचा शुभारंभ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वसंतपाटील सुगाचे यांच्या हस्ते करण्यात आले. भारत कॉटन जिनिगचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर हे अध्यक्ष स्थानी होत.होटाळकर यांनी मंगळवारी कापसाला ७३११ रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी प्रसिद्ध आर्टिकेट दत्तात्रय पाटील होटाळकर, कापूस खरेदीदार मनोज अग्रवाल, रफिक मणियार, शेतकरी नागनाथ भंडारे, साहेबराव पाटील पवार, राहुल पाटील नकाते, महेश पाटील पवार, शिवाजी पाटील
पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन पाटील चव्हाण, शिवाजी पाटील सावरखेडकर, सटवाजी मोदलवाड, भाऊ पाटील चव्हाण, दत्ता पाटील नारे, गजानन पाटील चव्हाण, रावसाहेब पाटील बेलकर, माधब पाटील उपाशे, लक्ष्मण पाटील उपाशे, गणेश पाटील पवार, सुरेश पाटील कदम, गजानन पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील शिंदे, किशनराव पाटील कारेगावकर, देवराज पाटील पवार, शिवराज शिंदे, दिगंबर नरवाडे तोरणा, नैतिक बोधणे नरसी, शेख फिरोज देगाव, प्रभाकर जाधव रुई व शेतकरी बांधव उपस्थित होते.
नायगावच्या भारत कॉटन जिनिंगमध्ये कापुस खरेदीला सुरुवात शुभारंभास प्रतिक्विंटल ७३११ रु. भाव

0Share
Leave a reply