Disha Shakti

क्राईम

लोणीकाळभोर पेट्रोलिंग पथकाची मोठी कामगिरी करत, चोरी व दरोड्यातील गुन्हेगाराला अटक…

Spread the love

पुणे प्रतिनिधी :  किरण शां. थोरात

        लोणी ते पुणे हद्दीत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , दिनांक १४/११/२०२३ रोजी खाजगी वाहनाने वाहनचोरी, करणारे तसेच गुन्हयातील पाहिजे व फरारी गुन्हेगार यांचेवर कारवाई करणेकामी हद्दीत पेट्रोलिंग करते वेळी पो हवा ५५ दत्तात्रय खरपुडे आणि पो शि ८७६७ विक्रांत सासवडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आण्णा साहेब कॉलेज जवळ इंद्रप्रस्थ कॉ ऑप सो फेज 1 मांजरी रोड हडपसर पुणे येथे एक इसम होंडा ऍक्टिवा गाडीचे लॉक खोलत आहे त्यांच्याकडे असलेली गाडी चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याला वरिष्ठांचे आदेशाने ताब्यात घेतले व त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव *1) शुभम नथुराम जाधव, वय 23 वर्ष रा. साई सत्यम पार्क लेन 1 वाघोली पुणे असे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेली HONDA कंपनीची निओ मोटार सायकल आणि होंडा कंपनीची ऍक्टिवा गाडी चोरीची असले बाबत माहिती मिळाली *HONDA निओ बाबत हडपसर पो स्टे येथे गु र नं 1332/2023 भादवि 379 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले.* त्यास पथकाच्या आणून त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कडून 2 दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे

       सदर मोटार सायकली पंचनाम्याने जप्त केल्या आहेत.

       *आरोपीकडून खालील प्रमाणे 2 गुन्हे उघडकीस आले असून एकूण 35,000 रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे*

1) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1332/2023, कलम 379

2) मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 280/2023, कलम 379

 

       आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे

 

        *सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, अशोक आटोळे, दिनकर लोखंडे, दत्तात्रय खरपुडे, विनायक रामाने, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे*.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!