दिशाशक्ती प्रतिनिधी / शोएब शहा : नगर शहरामध्ये असलेल्या जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये रोज हजारो लोक आपल्या कामानिमित्त येत असतात परंतु या बिल्डिंगमध्ये आलेल्या नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात गैर सोय होत असून या प्रशासकीय इमारतीमध्ये असलेले तीन लेडीज व तीन जेन्स टॉयलेट आहे व दुसऱ्या मजल्यावर दोन खाली ग्राउंड फ्लोअर वर दोन आणि मागील बाजूस नवीन टॉयलेट आहे परंतु या तिन्ही टॉयलेटला कुलूप असल्याने पुरुष व महिलांची गैरसोय निर्माण होत असून आपापल्या कामानिमित्त येणारे नागरिकांना लघुशंका करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून त्यासाठी शोधाशोध घ्यावी लागत आह़े.
या परिस्थित महिलांना मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागत असून या कार्यालयात आल्यावर मानसिक त्रास सहन करावा लागत आह़े. महिलांसाठी लेडीज टॉयलेट आह़े परंतु ते ही लॉकबंद असल्यामुळे नुसते असून खोळंबा अशी गत निर्माण झाली आह़े.
येथे येणारे नागरिकांची व महिलांची मोठ्या गैर सोय होत असून या सर्व भोंगळ व्यवस्थेला नेमके जबाबदार कोण असा प्रश्न ? निर्माण होत आह़े. याबाबत कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता सर्व अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली आहेत. याबाबत संबंधित शिपाई व कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करून लवकरात लवकर या सुविधा चालू करून महिलांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याची मागणी इथे येणाऱ्या नागरिकांनी व महिलांनी केली आहे
Leave a reply