दिशाशक्ती प्रतिनिधी / नाना जोशी : स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी येथील धर्माडी गेस्ट हाऊसमध्ये अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी सुरुवातीला संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव योगेश पाटील यांनी संघटनेची माहिती सांगितली त्यानंतर संभाजीनगर जिल्हा अध्यक्षपदी भानुदास साळुंके तर अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी योगेश शेठ सुराणा तसेच उत्तर महाराष्ट्र समन्वयक तथा प्रसिद्धी प्रमुख म्हणून संतोष आहेर यांची निवड करण्यात आली.तसेच राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे देवा यांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व सर्वांना आयडी कार्ड तसेच पदाचा वापर कसा करावा याबद्दल थोडक्यात माहिती दिली.
यावेळी विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य समन्वयक भरत नजन, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष जावळे, उत्तर महाराष्ट्र संघटक समीरभाई शेख तसेच अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीतील अण्णासाहेब हरिश्चंद्रे, शंकर कव्हाणे, सचिन हिंगे, योगेश शेठ सुराणा, डॉ.देवेंद्र शिंदे, नानासाहेब जोशी , संतोष आहेर, प्रकाश धनगर, नितीन कुर्हे, नारायण अनाप, विशाल डुकरे, निलेश आहेर, वेदांत सुरवसे, दीपक नालकर,तेजस तांबे, प्रसाद थोरात, सुहास वाघमारे, विक्रम थोरात, नवनाथ साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या अ.नगर जिल्हा अध्यक्षपदी योगेश सुराणा यांची निवड

0Share
Leave a reply