विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : वांगी येथील चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या व मालक तसेच ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा 28 नोव्हेंबर रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करू या मागणीचे निवेदन श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी किरण सावंत यांना माहिती व कायद्याच्या उपसंपादक विजयाताई बारसे यांनी निवेदन दिले.
यावेळी उपसंपादक विजाताई बारसे म्हणाल्या की 4 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री वांगी शिवारात अवैध चोरटी वाळू वाहतूक करताना भरलेले चार डंपर तसेच एक जीसीबी महसूल अधिकाऱ्याने पकडले होते परंतु तेथे पांढऱ्या रंगाची इंडिका व काळया रंगाची महिंद्रा कंपनीचे बोलोरो आल्यानंतर वाळू तस्कर आणि ठेकेदार व अधिकार यामध्ये काहीतरी जांगडगुत्ता झाल आणि ते चारी डंपर व जीसीपी त्या अधिकाऱ्यांनी सोडून दिले.महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की गोदावरी व प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू तस्करी सुरू आहे.
या विरोधात कोणालाही सुट्टी देऊ नका असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगून सुद्धा त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम तालुक्यातील महसूल अधिकारी यानी केले आहे.यांच्या आदेशाची परवाना करता कारवाई न करता वाळूने भरलेले डंपर का सोडून देण्यात आले ज्या महसूल अधिकाऱ्यांनी डंपर सोडून देण्यात आले त्या अधिकाऱ्यावर व डंपर मालकाबरोबर ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
सरकारने मांजरीलाच दुधाचे राखण करायला दिले तर ते दूध मांजर पिणारच म्हणून तो दिला ठेका त्वरित रद्द करून संबधित अधिकारी व ठेकेदार डंपर चालक-मालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर 28 11 2023 रोजी सकाळी 11 वाजता माहिती व कायदा पत्रकार संघ व मीडिया सर्व सदस्यांच्या वतीने आम्ही उपोषणाला बसणार आहोत याची आपण नोंद घ्यावी यावेळी वंदनाताई गायकवाड . कल्पनाताई तेलोरे .जयश्रीताई पवार सनी बारसे .अश्विनी साळवे. इतर पदाधिकारी उपस्थित होते
वांगी येथील चोरटी वाहतूक करणाऱ्या गाड्या मालक, व ठेकेदारांवर कारवाई करा अन्यथा 28 ला उपोषण करणार : विजयाताई बारसे

0Share
Leave a reply